मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे शुक्रवारी(दि.२ ऑगस्ट) मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ

 छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात दि.२ ऑगस्ट पासून सिल्लोड येथून होणार आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. शुक्रवार दि.२ ऑगस्ट रोजी महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथे होणार आहे. राज्य शासनाने महिला सशक्तीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरु केली असून त्यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी या सशक्तीकरण अभियानाचा प्रारंभ करुन हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा