शासकीय वाहनांचा लिलाव

छत्रपती संभाजीनगर दि.३१ (जिमाका) – जिल्हाधिकारी कार्यालयातील जुनी टाटा सुमो वाहन क्र.MH-20-AS 222, MH-20A-AS 444 ही वाहने जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर या परिसरात  असून ज्या स्थितीत, जेथे आहे व जशी आहे तशी या तत्वावर लिलाव पद्धतीने विक्री करावयाची आहेत. लिलावाची नोटीस आणि सविस्तर अटी व शर्ती याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  www.aurangabad.nic.in संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली असून ही माहिती कार्यालयीन वेळेत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे उपलब्ध आहे.दि.१ ते ९ ऑगस्ट  या कालावधीत सर्व इच्छुकांना लिलावासाठी सहभाग नोंदविता येईल. दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा.जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात लिलाव घेण्यात येईल. यासंदर्भातील पुढील सर्व माहिती, शुद्धीपत्रक, नियत तारखेतील विस्तार (काही असल्यास) www.aurangabad.nic.in या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल असेही उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.

०००००


Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा