धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना

  छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील व उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पंडीय दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचा असावा. विद्यार्थी वसतिगृहास पात्र असावा. महाराष्ट्र राज्याचा असावा. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातप्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक, पालकांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. ज्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे त्या शहरातील तो  रहिवासी नसावा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, छत्रपती संभाजीनगर , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक संचालक पी.बी.वाबळे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा