महिला बचत गटाला ‘मॉल’मध्ये स्टॉल उपलब्ध करुन द्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 


छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- महिला बचत गटांना मॉल मध्ये स्टॉल उपलब्ध करुन दिल्यास बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होईल. ग्राहकांना उत्तम वस्तू  उपलब्ध होतील, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

लखपती दिदी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.२९) बैठक पार पडली. जिल्‍हा परिषद चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी  विकास मीना, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी अशोक सिरसे, माविवेचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड, डी मार्ट व्यवस्थापक अनिल जराटे, जसवंत सिंग,  फार्म फुड, देवगिरी मार्टचे  ज्ञानेश डांगे, रिलायन्स मार्टचे ज्ञानेश्वर बन्सोडे उपस्थित होते.

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना  म्हणले क , बचत गटांच्या महिलांना व्यवसायातून रोजगार निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करणार येत आहे. त्यातून महिलांचे वैयक्तिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल. त्यासाठी बचत गटांच्या उत्पादनांना विस्तारीत स्वरुपात बाजारपेठ उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण जिल्हा प्रशासन देईल.

               जिल्हाधिकारी  दिलीप स्वामी म्हणाले की,बचत गटांच्या महिलांनी तयार केलेली उत्पादने शहरात पोहचणे गरजेचे आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही महिला बचत गटांना असे स्टॉल्स उपलब्ध करुन द्यावे,असे निर्देशही त्यांनी दिले.

 

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा