भारतीय नागरिक सुरक्षा संहिता; पोलीस व महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

 






छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2022 या कायद्या बाबत महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

            जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक विनयकुमार, पोलीस उपाधीक्षक मेहेक स्वामी, सुनील लांजेवार, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड , पैठण फुलंब्री उपविभागीय अधिकारी नीलम बाफना,  उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे,रामदास दौंड, एकनाथ  बंगाळे, विधी अधिकारी उषा वायाळ सर्व तहसीलदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी उषा वायाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२२ अंतर्गत विविध महत्त्वाची कलमे व त्या अंतर्गत देण्यात आलेले कार्यवाहीचे प्रावधान याबाबत त्यांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा