अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

 छत्रपती संभाजीनगर दि.३०(जिमाका)-   सन २०२४-२५  या शैक्षणिक वर्षात राज्यातील अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या प्रसिद्धी करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.६ सप्टेंबर असून अर्ज आयुक्त, समाज कल्याणआयुक्तालय महाराष्ट्र राज्य, ३, चर्चपथ, पुणे-१ यांच्याकडे सादर करावयाचे आहेत. तरी अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पी.जी.वाबळे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा