निवडणूक निरीक्षक दाखलःप्रशासनाचा घेतला आढावा; नागरिकांनाही भेटणार

 छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नेमलेल्या निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यापूर्वीच जिल्ह्यात खर्च निरीक्षकही दाखल झाले आहेत. दरम्यान आज या सर्व निरीक्षकांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला.

भारत निवडणूक आयोगातर्फे जिल्ह्यात विधानसभा निवडणुक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेले निरीक्षक काल रात्री शहरात दाखल झाले. त्यात बिद्यानंद सिंग (१०४-सिल्लोड, १०५- कन्नड), तलत परवेज(१०६-फुलंब्री,१०७-औरंगाबाद मध्य),    श्रीमती कोर्रा लक्ष्मी (१०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व), उज्ज्वलकुमार सिंग (११०-पैठण, १११- गंगापूर, ११२ वैजापूर) तसेच कायदा सुव्यवस्थेसाठी राजपालसिंग यांचा समावेश आहे.  यासर्व निरीक्षकांनी आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयास भेट देऊन झालेल्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांचे स्वागत केले. आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड,अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके सर्व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

            जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय  आचारसंहिता अंमलबजावणी, मतदान केंद्र, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी प्रशिक्षण इ. विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क क्रमांक व भेटीची वेळ





निवडणूक निरीक्षक हे सामान्य नागरिक, मतदार यांनाही भेटणार असून त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.  त्यासाठी त्यांचे निवासाचे ठिकाण, भेटण्याची वेळ व संपर्क क्रमांक याप्रमाणे-

१.      श्री. बिद्यानंद सिंग (भा.प्र.से.) १०४-सिल्लोड, १०५- कन्नडः- सुभेदारी विश्रामगृह ॲनेक्स बिल्डींग, सिंधफणा कक्ष, मोबाईल क्रमांक- ७५५८७१४९४३  ई-मेल- bidya_muz@rediffmail.comभेटीची वेळ-सकाळी १० ते ११.

२.      श्री. तलत परवेज इक्बाल रोहेला(भा.प्र.से.) १०६- फुलंब्री, १०७ औरंगाबाद(मध्य)- सुभेदारी विश्रामगृह मुख्य इमारत मांजरा कक्ष, मोबाईल क्रमांक-७३८५७१४९४३ ई-मेल-  talat.rohella@jk.gov.in भेटीची वेळ- सकाळी १० ते ११.

३.      श्रीमती कोर्रा लक्ष्मी (भा.प्र.से.) १०८-औरंगाबाद पश्चिम, १०९-औरंगाबाद पूर्व- सुभेदारी विश्रामगृह मुख्य इमारत तेरणा कक्ष, मोबाईल क्रमांक-७३८७७१४९४३. ई-मेल-  lakshmikorra@gmail.com भेटीची वेळ-सकाळी १० ते ११ वा.

४.    श्री. उज्ज्वलकुमारसिंग(भा.प्र. से.) ११०-पैठण, १११-गंगापूर, ११२-वैजापूर- सुभेदारी विश्रामगृह ॲनेक्स बिल्डींग पेनगंगा कक्ष. मोबाईल क्रमांक-७०२८७५२५४८. ई-मेल- ujjwal.kumar1967@gov.in भेटीची वेळ-सकाळी साडेदहा ते साडेअकरा.

५.     श्री. राजपालसिंग (भा.पो. से.)- सिनीयर पोलीस मेस, अजंता कक्ष मोबाईल क्रमांक-७०२८७५२५४६. ई-मेल- rajpal.sandhu@yahoo.com भेटीची वेळ-सकाळी १० ते ११.

६.      श्री. कोटपती वाम्शी क्रिष्णा (भा.म.व ले.सेवा) सुभेदारी विश्रामगृह अजंता इमारत कक्ष क्रमांक ८ अ. मोबाईल क्रमांक-७०२८७५२५४४. ई-मेल- vamsi.k.kotapati@incometax.gov.in भेटीची वेळ- दुपारी साडेचार ते साडेपाच वा.

७.     श्री. सोभान सुत्रधार(भा.म.व ले.सेवा) सुभेदारी विश्रामगृह अजंता इमारत कक्ष क्रमांक ५अ. मोबाईल क्रमांक-७०२८७५२५३७. ई-मेल- sobhan.sutradhar@incometax.gov.in भेटीची वेळ- सकाळी साडेसात ते नऊ वा.

नागरिकांनी आपल्या तक्रारींसाठी निवडणूक निरीक्षकांना त्यांनी दिलेल्या वेळेत भेटून आपले शंकानिरसन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा