आदर्श आचारसंहिता पालनासाठी दक्ष रहावे-विकास मीना

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका):- निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितापालनासाठी सर्व पथक प्रमुखांनी ,सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दक्ष राहून कारवाई करावी,असे निर्देश आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी  विकास मीना  यांनी  आज दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षामध्ये आज जिल्ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदार संघनिहाय आचारसंहिता नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, महानगरपालिका अपर आयुक्त  रणजीत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, खनिकर्म अधिकारी किशोर घोडके, श्रीमती उपासे यांच्यासह  जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातील आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

            यावेळी सुचना देण्यात आल्या की, आचार संहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडीओ पथके यांनी  बस स्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनात  रोख रक्कम वाहतूकीबाबत तपासणी करावी. त्याचप्रमाणे संशयास्पद ठिकाणी  अचानक क्षेत्रभेट देऊन तपासणी करावी. तपासणीची  व्हिडिओग्राफी ,लेखी नोंदी असणे आवश्यक आहे. तपासणी केल्यानंतर प्रत्येक दोन दिवसांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भेटीचे नियोजन मतदारसंघनिहाय करावे.   दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर विविध ठिकाणी  कपडे, भेटवस्तू किंवा इतर वस्तूचे वाटप करुन मतदारांना प्रलोभन दिले जाऊ शकते. याबाबतही योग्य ती खबरदारी या कक्षामार्फत नियुक्त अधिकारी कर्मचारी घ्यावी.  विनापरवानगी पोस्टर, बॅनर याबाबत प्रचार होत असेल तर तात्काळ दखल घ्यावी.  सी विजील या ॲपवर येणाऱ्या तक्रारींचीही तात्काळ दखल घेण्यात यावी. योग्य ते पुरावे जतन करावे. आचारसंहिता पालन करत असताना योग्य ती खबरदारी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी, विविध क्षेत्रातील भेटीचे नियोजन, रोख रक्कम आढळून आल्यास करावयाचे कार्यवाही बाबत मार्गदर्शन या बैठकीमध्ये करण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा