प्रतिबंधात्मक आदेश जारी

छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)- आगामी काळातील सण, उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९७१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहेत. दि.२ नोव्हेंबर पर्यंत हे आदेश लागू असतील. या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र वापरण्यास, दाहक स्फोटक पदार्थ बाळगण्यास, प्रक्स्होभक भाषणे, असभ्य वर्तन करण्यास, प्रतिमा, आकृत्या इ. चे प्रदर्शन करण्यास इ. कृत्य करण्यास तसेच  पाच किंवा पाचापेक्षा अधिक व्यक्तिंना विनापरवानगी एकत्र येणास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशातून कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी व अन्य सक्षम अधिकारी यांना वगळण्यात आल्याचेही आदेशात नमूद आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा