कारागृहबंद्यानी निर्माण केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळावा
छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध या उद्देशाने दि.२९ ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान बंदी निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधिश सुभाष कुऱ्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास मध्यवर्ती
कारगृह अधीक्षक दत्तात्रय गावडे, उपअधीक्षक संदीप भुतेकर, वरिष्ठ तुरुंगअधिकारी
प्रदीप रणदिवे, तुरुंग अधिकारी सतिष हिरेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते.
कारागृहातून सुटल्यावर बंदी
समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा, म्हणून बंद्यांना बंदीवासात विविध व्यवसायांचे
व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. जेणे करुन बंदी कारागृहातून सुटका झाल्यावर कारागृहात
घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करु शकतो. कारागृह
विभागाचे ब्रिद वाक्य सुधारणा व पुनवर्सन असुन कारागृहातील बंदी हा समाजाचा एक घटक
असतो. बंदीवासात तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने
महाराष्ट्र कारागृह उद्योग विक्री केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. विविध सणाचे
औचित्य साधून बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात
येते. दिवाळी सणानिमित्त यावर्षी बंद्यांनी तयार केलेल्या विविध प्रकाराच्या
आकर्षक कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
आहे.
प्रदर्शन व विक्री
सोहळ्यामध्ये बंद्यांनी तयार केलेले विविध प्रकारचे फर्निचर, देवघर, सागवानी
पाळणे, चौरंग पाट, बैलगाडी, टी. पॉया, स्टूल, पोळपाट तसेच लोहारकाम विभागमध्ये
लोखंडी सटुल, सुपली, चप्पल स्टँड, बांगडी स्टँड, लोखंडी बैलगाडी, लोखंडी खेळण्याचे
विमान तसेच विणकाम विभागामध्ये पंजादरी, पंजादरी, पंजा चेअर मेट, दरी, जॅकेट,
बेडशिट, टॉवेल, रुमाल, लेडीज पर्स, शर्ट, सुती साडी, पॉवरलूम विभागामध्ये टॉवेल,
गमजे, बेडशिट, हॉस्पीटल व मांजरपाट कापड इ. वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या असून त्या
ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे
भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनास नागरिकांनी भेट द्यावी,असे आवाहन कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे यांनी केले
आहे.
०००००



Comments
Post a Comment