आचारसंहिता कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन नाही

छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषीत केला असून त्यानुसार दि.२५ नोव्हेंबर पर्यंत  निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे. तरी या कालावधीत येणाऱ्या सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी होणारा लोकशाही दिन होणार नाही असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

०००००


Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा