मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश

 छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ साठी शनिवार दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे.  मतमोजणी शांततेत व्हावी यासाठी मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. त्याअन्वये मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्राधिकृत व्यक्तिंव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तिस प्रवेश करण्यास, मोबाईल नेण्यास  प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी यांना लागू राहणार नाहीत,असे स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा