विद्यार्थ्यांच्या जातीप्रमाणपत्र पडताळणीसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहिम

 छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका)- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विविध राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत गुरुवार दि.२८ नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे,असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव किशोर कुलकर्णी यांनी कळविले आहे.

या शिबिराचा लाभ खालील विद्यार्थी गट घेऊ शकता-

१.      अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, एसईबीसी यासारख्या राखीव प्रवर्गातील  सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ११ वी किंवा १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश असलेले विद्यार्थी.ज्यांना १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचे आहेत.

२.      ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर एम.बी.ए., एम.सीए.ए., एल.एल.बी.(तीन वर्ष), बी.एड. इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे.

३.      तंत्रनिकेत अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केले आहेत व त्यांची प्रकरणे त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित आहेत.

            अशा विद्यार्थ्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी  ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम गुरुवार दि.२८ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव किशोर कुलकर्णी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा