मतदान व मतमोजणीच्या दिवशीचे आठवडी बाजार बंद

 छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ साठी बुधवार दि.२० रोजी मतदान व दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे.  याकालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच मतदान निर्भय निष्पक्ष व मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी  बुधवार दि.२० रोजी व शनिवार दि.२३ रोजी असणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश  जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत. या दिवशी भरणारे बाजार हे अन्य दिवशी भरवावे असेही आदेशात नमूद केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा