मतमोजणी केंद्राचे ठिकाणांना निवडणूक आयोगाची मान्यता
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघात करावयाच्या मतमोजणी केंद्रांचे प्रस्ताव निवडणूक आयोगास पाठविण्यात आले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्रांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी कळविले आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी केंद्राचे ठिकाण याप्रमाणे-
१०४- सिल्लोड-
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवे, सिल्लोड ता. सिल्लोड.
जि. छत्रपती संभाजीनगर.
१०५- कन्नड-
इनडोअर हॉल, शिवाजी महाविद्यालय, कन्नड, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर.
१०६-फुलंब्री-
गरवारे हायटेक फिल्म्स लि. चिकलठाणा एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर.
१०७-औरंगाबाद
(मध्य)- शासकीय तंत्रनिकेतन , रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर.
१०८-औरंगाबाद(पश्चिम)-
शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर.
१०९-औरंगाबाद(पूर्व)-सेंट
फ्रान्सीस डी सेल्स हायस्कूल, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर.
११०- पैठण-
प्रशासकीय इमारत, संतपीठ, जायकवाडी धरणाजवळ, पैठण, ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर.
१११-गंगापूर-
इनडोअर स्टेडियम हॉल, श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती
संभाजीनगर.
११२-वैजापूर-
टेनिस कोर्ट हॉल, विनायक पाटील महाविद्यालय, येवला रोड, वैजापूर ता. वैजापूर जि. छत्रपती
संभाजीनगर.
०००००
Comments
Post a Comment