आरोग्य विभागातर्फे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा
छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका)- कुटुंब नियोजन ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वतीने आजपासून (दि.२१) ते बुधवार दि.४ डिसेंबर या कालावधीत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा राबविण्यात येत आहे. पुरुष नसबंदी विषयी जनजागृती करणे, लोकांना पुरुष नसबंदीचे महत्व पटवुन देणे, स्त्रीयांप्रमाणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी ही पुरुषांची सुद्धा आहे, या विषयी माहिती देऊन समुपदेशन करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
हे अभियान दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात
येणार आहे. पहिल्या टप्प्यात दि.२१ ते दि.२७ नोव्हेंबर दरम्यान लाभार्थ्यांशी संपर्क
साधणे. त्यांना पुरुष नसबंदीचे महत्व पटवून देणे व प्रवृत्त करणे, योग्य जोडप्यांच्या
याद्या तयार करणे.ज्यांनी यापुर्वी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे.अशा लाभार्थ्यांमार्फत
मोहीमेचा प्रचार व प्रसार करुन माहीती देण्यात येईल.
दुसऱ्या
टप्प्यात दि.२८ नोव्हेंबर ते दि.४ डिसेंबर ‘सेवा आठवडा’ म्हणुन राबविण्यात येणार आहे.
यामध्ये जिल्हा व तालुकास्तरीय लाभार्थ्यांचे शस्त्रक्रियेसाठी पूर्व नोंदणी करुन शिबिरे
आयोजित करण्यात येतील. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असुन लाभार्थ्यास
१ हजार ४५१ रु. प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.या अभियानात जास्तीत जास्त पुरुषांनी
नसबंदी शस्त्रक्रिया करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळकुष्ण लांजेवार
यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment