जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२४ निकाल घोषित
छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):-जी.डी.सी.ए. व सी.एच.एम. परीक्षा २०२४ सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत मे २०२४ मध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे,असे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी कळविले आहे. हा निकाल परिक्षार्थ्यांना https://gdcamaharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपापला लॉगइन व पासवर्ड वापरुन पाहता येईल. तसेच https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महत्त्वाचे दुवे मधील जी.डी.सी.ॲण्ड ए मंडळ येथे पहावयास मिळतील. फेरगुण मोजणीसाठी परिक्षार्थ्यांना दि.५ जानेवारी २०२५ पर्यंत https://sahakarayukta.maharashtra.gov.in यावेबसाईटवर आपला लॉगइन व पासवर्ड वापरुन अर्ज करता येईल. फेरगुण मोजणीचे शुल्क भारतीय स्टेत बॅंकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी ७५ रुपये या प्रमाणे व अधिक बॅंक चार्जेस या प्रमाणे चलनाद्वारे भरावे. बॅंकेचे चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मदत दि.५ जानेवारी २०२५ च्या रात्री साडेदहा (२२.३०) पर्यंत राहील. हे चलन दि.५ ते ८ जानेवारी २०२५ पर्यंत बॅंकेच्या कामकाजाच्या वेळत भरणा करावे. मुदतीनंतर प्राप्त अर्जांवर विचार होणार नाही,असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी कळविले आहे.
०००००
Comments
Post a Comment