सोमवारी (दि.६ जानेवारी रोजी) लोकशाही दिन
छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. जानेवारी महिन्यासाठी सोमवार दि. ६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. ६ रोजी दुपारी १२ वाजता हा लोकशाही दिन होईल, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी अर्जांचे निवेदने, अर्ज सकाळी ११ते १२ या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. वैयक्तिक तक्रार असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी,अशी सुचना देण्यात आली आहे. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment