जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी





छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका):-
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी केली.   

            उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार सारंग चव्हाण, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक डोंगरे व कनिष्ठ अभियंता तुषार विसपुते तसेच पैठण उद्यान विकास समितीचे विजय सुते, रमेश लिंबोरे, बाळु आहेर, संतोष गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.

            पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास व सुशोभिकरणाचे काम सुरु असून ते लवकरात लवकर पर्यटकांना खुले करण्याच्या दृष्टिने कामाची प्रगती पाहण्यासाठी आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज उद्यानास भेट दिली. सुरु असलेले कामकाज तसेच या कामासंदर्भात प्रस्तावित आराखड्यातील तरतूदी याबाबत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. येथे आल्यानंतर पर्यटकांना आल्हाददायक वाटायला हवे,असेही त्यांनी सांगितले.

०००००


Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा