जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (दि.३०)

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)-जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवार दि.३० रोजी सकाळी ११ वा. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजीत करण्यात आली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहतील,असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव दिलीप स्वामी यांनी कळविले आहे. बैठकीच्या कामकाज पत्रिकेत, दि.३ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीतील कार्यवाहीचा पुर्तता अहवाल, जिल्हा वार्षिक योजनेच्या सन २०२५-२६ च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे, सन २०२४-२५ अंतर्गत माहे डिसेंबर २०२४ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेणे, जिल्हा विकास आराखडा २०२४-२८ वर चर्चा करणे व त्यास मान्यता देणे इ.विषयांचा समावेश असून या विषयांवर बैठकीत कामकाज होणार असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा