कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेत २०० धावपटूंचा सहभाग

 




छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)-राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी आयोजीत खुल्या मॅरेथॉनचे स्पर्धेत आज २०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.

 राष्ट्रपिता  महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. कुष्ठरोग दिन आणि कुष्ठरोग जनजागृती पंधरवाडाअंतर्गत  स्पर्श जनजागृती अभियान २०२५ निमित्त खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २०० स्पर्धकांनी भाग घेतला त्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र, गौरव चिन्ह वाटप करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका डॉ.राणे मॅडम व प्रभारी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. नाथराव फड, मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल चव्हाण, कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र  वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती. विद्या सानप, जिल्हा पर्यवेक्षक विष्णु घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी  बाजीराव देसाईआदी यावेळी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा