राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमः आज (दि.३०) मॅरेथॉन दौड

 छत्रपती संभाजीनगर ,दि. २९(जिमाका)- कुष्ठरोग विषयक जनजागृती अभियान गुरुवार दि.३० ते दि.१३ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. गुरुवार दि.३० रोजी सकाळी ६ वा. मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागाचे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, सहायक संचालक कुष्ठरोग शिवकुमार हलकुडे यांनी केले आहे.

कुष्ठरोग जनजागृतीपर उपक्रम राबविण्यासाठी जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे घोषणापत्र, सरपंचाचे भाषण व कुष्ठरोग प्रतिज्ञा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व उपकेंद्र व सर्व शासकीय कार्यालयामध्ये वाचन करण्यात आले. तसेच गुरुवार दि.३० रोजी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त खुल्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय क्रीडा संकूल ते  गजानन महाराज मंदीर ते पुन्हा क्रीडा संकूल असा या स्पर्धेचा मार्ग असेल. विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ४ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक २५०० रुपये व तृतीय पारितोषिक १५०० रुपये देण्यात येणार आहे. सहभागासाठी नागरिकांनी सकाळी ६ वा. विभागीय क्रीडा संकूल गारखेडा परिसर येथे नावनोंदणी करावी. नोंदणीसाठी बॅंक पासबुक व आधार कार्ड सोबत आणावे,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा