मध्यवर्ती कारागृहात ‘जीवन गाणे गातच जावे’

 



छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, पुणे यांच्या मार्गदर्शानाखाली विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) मध्य विभाग, यांच्या सहकार्याने कारागृहातील बंद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावे व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा ते कारागृहात मुक्त झाल्यावर समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे या करीता मंगळवार दि.२५ ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध लोककला, भारुड, देशभक्तीपर गीत, नृत्य या सारख्या विविध कलांचा समावेश होता. या आयोजनात अधीक्षक मध्यवर्ती कारागृह दत्तात्रय गावडे, वरिष्ठ तुरंगाधिकारी प्रदीप रणदिवे तसेच कार्यक्रमाचे समन्वयक अनिल घोगरे तसेच त्यांचा म्युझिकल ग्रुप आणि मोठ्या संख्येने बंदीजन अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा