आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरण करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- आधार कार्डसाठी मँडेटरी बायोमेट्रिक अपडेट (MBU) करणे आवश्यक असून, नागरिकांनी आपली नोंदणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अद्यावतीकरण
कोणाला आवश्यक
ज्या बालकांचे ० ते ५ वयात आधार कार्ड तयार झाले आहे, त्यांना
५ ते ७ वर्षे वयात बायोमेट्रिक अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच, १५ ते १७ वर्षे वयोगटातील
युवकाचे देखील बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक आहे.
४ लाख
५१ हजार ५३६ जण अद्यावतीकरणास पात्र
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण २,६६,४२९ पाच ते सात वर्षे
वयोगटातील बालक आणि १,८५,१०७ पंधरा ते सतरा वर्षीय युवक असे एकूण ४ लाख ५१ हजार ५३६ बालक व युवक आधार बायोमेट्रिक
अद्यावतीकरणासाठी पात्र आहेत.
अद्यावतीकरण
विनामूल्य
आधारच्या नियमांनुसार, हे अद्ययावत करणे विनामूल्य असून नागरिकांना
कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. यासाठी नागरिकांनी जवळच्या आधार नोंदणी केंद्रात
जाऊन आपली बायोमेट्रिक माहिती अद्यावत करून घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प
व्यवस्थापक जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन
करण्यात आले आहे.
०००००

Comments
Post a Comment