कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यातून १६२ उमेदवारांची निवड
छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आज मुकुंदवाडी येथे पार पडला. या मेळाव्यात नोकरीसाठी १६२ उमेदवारांची प्राथमिक तर ७२ जणांची अंतिम निवड झाली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली आहे.
मेळाव्यात
उपस्थित उद्योजक प्रतिनीधींनी आपल्याकडील रिक्तपदांची माहिती देऊन कामाचे स्वरुप व
यातून उमेदवारांची होणारी प्रगती याविषयी माहिती दिली.
या रोजगार मेळाव्यामध्ये रत्नप्रभा मोटर्स, बी जी
ली - ईन इलेट्रिकल्स, अलंकार ग्रूप, समर्थ इलेक्ट्रोकेअर, एम.कांतीलाल क्लॉथ स्टोअर्स,
धुत ट्रान्समिशन प्रा.लि., मेडिरिक्रुटर्स आणि कुशल पॅथॉलॉजी लॅब, सुदर्शन सौर शक्ती
प्रा.लि., धनंजय ग्रुप, आर्म्स प्रा.लि., प्रथम एजुकेशन फांऊडेशन इत्यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित नियोक्त्यांनी सहभाग दर्शवून उमेदवारांच्या
मुलाखती घेतल्या. त्यात १६२ उमेदवारांची प्राथमिक तर ७५ उमेदवारांनी अंतिम निवड झाली.
०००००
Comments
Post a Comment