पंडीत दीनदयाळ रोजगार मेळावा आज (दि.२६)
छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका)-कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा बुधवार दि.२६ रोजी सकाळी साडेनऊ वा. संत रोहिदास आरोग्य केंद्र, संजयनगर, मुकुंदवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक आयुक्त वराडे यांनी केले आहे.
या रोजगार
मेळाव्यामध्ये रत्नप्रभा मोटर्स, चिकलठाणा, बी.जी. लीन इलेक्ट्रीकल्स लि., ग्रीव्हज
कॉटन प्रा.लि. शेंद्रा, अलंकार इंजिनीअरींग इक्वीपमेंट प्रा.लि., समर्थ इलेक्ट्रोकेअर
प्रा.लि. एम. कांतिलाल क्लॉथ स्टोअर्स (साकला युनिफॉर्म), धूत ट्रान्समिशन प्रा.लि.,
मेडीरिक्रूटर्स आणि कूशल पॅथॉलॉजी लॅब, अश्फा ग्लोबल सर्व्हिसेस प्रा.लि., सुदर्शन
सौर शक्ती प्रा.लि. इ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित नियोक्त्यांचे प्रतिनीधी
५०४ वेगवेगळ्या रिक्तपदांकरीता मुलाखती घेतील. यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग,
डिप्लोमा, आय टी आय, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांना विविध
शैक्षणिक व व्यावसायीक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या मेळाव्यात
सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी
व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
संकेतस्थळावर
नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी
क्रमांक ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
०००००
Comments
Post a Comment