वैद्यकीय परिषद निवडणूक गुरुवारी(दि.३ एप्रिल)

 छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र.७२/२०२४ प्रकरणातील निकालानुसार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवर एकूण ९ (नऊ) सदस्य निवडणूकीसाठी गुरुवार दि.३ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना कळविण्यात आले आहे की, वैद्यकीय परिषद निवडणूक – २०२५ या निवडणूकीकरीता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे दि.३१ डिसेंबर २०२४ पर्यंत नोंदणी झालेले व नोंदणीचे नुतणीकरण केलेले वैद्यकीय व्यावसायिक हे मतदार आहेत. मतदार यादीनुसार जिल्ह्यातील ४३५२ मतदार या निवडणूकीमध्ये मतदान करण्यास पात्र आहेत. प्रत्येक मतदारांस एकूण ९ मते देण्याचा अधिकार आहे. निवडणूक कार्यक्रमाची सुचना निर्वाचन अधिकाऱ्यांमार्फत शासन राजपत्रात दि.१७ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवडणूकीकरीता एकूण ४१ उमेदवार रिंगणात आहेत.जिल्ह्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची नावे समाविष्ट असलेली मतदार यादी निर्वाचन अधिकाऱ्यांकडून पुरविण्यात येणार आहे. मतदारयादीत समाविष्ट असलेले नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक निवडणूकीतील मतदार आहेत. तरी या निवडणुकीसाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी एक तास अगोदर मतदानाचे ठिकाणी उपस्थित राहावे. मतदानाचे ठिकाण – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, मतदान गुरुवार,दि.३ एप्रिल; वेळ-सकाळी ८ ते सांयकाळी ५ पर्यंत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा