धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातील जुने निरुपयोगी साहित्य विक्रीस उपलब्ध

 छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- येथील धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातील जुने, निरुपयोगी भांडार साहित्य निर्लेखित करुन विल्हेवाट लावायचे आहे. त्यासाठी हे साहित्य धर्मादाय सह आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बाबा पेट्रोल पंपाजवळ, अदालत रोड छत्रपती संभाजीनगर येथे उपलब्ध आहे. भांडार साहित्य दि.५ मे पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते सायंकाळी ६) वाजेपर्यंत पाहता येणार आहे. दिलेल्या कालावधीत साहित्याचे दर या कार्यालयास कळवावे. दर कळविताना लाकूड, लोखंड व फायबर, रद्दी (पुठ्ठे व कागद) यांचे दर प्रति किलोप्रमाणे व गाडीचे टायर प्रति नगाप्रमाणे दर कळवावे. जास्तीतजास्त दर असणाऱ्या फर्मचा विचार करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. साहित्य निर्लेखन व विक्री करण्याचे सर्व व रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत,असे धर्मादाय सह आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय धर्मादाय उप आयुक्त यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा