इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

 छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका) –छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातूर या जिल्ह्यात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला, मुलींना इयत्ता १ ली मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

            योजनेचा लाभ देऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत असावी. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधित छायाकिंत प्रत व दारिद्रय्‍ रेषा अनुक्रमांक नमुद करावा.  पालकाची उत्पन्न मर्यादा ही एक लाख रुपये एवढी असून यासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात यावे. अर्जासोबत पालकांनी समंतीपत्रक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे. या योजनेत आदीम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत.

            प्रकल्प कार्यालयात प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध असून दि.२३ मे पर्यंत परिपूर्ण प्रवेश अर्ज जमा करणे आवश्यक आहे.

            या योजनेतंर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर होणारा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, येथे संपर्क साधावा. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यास शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश घेण्याबाबतचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा