सोमवारी (दि.2 जून) लोकशाही दिन

 छत्रपती संभाजीनगर, दि.26 (जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. एप्रिल महिन्यासाठी सोमवार दि.2 जून रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि.2 रोजी दुपारी 12 वाजता हा लोकशाही दिन होईल, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपले अर्ज, निवेदने  सकाळी 11 ते 12 या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार वैयक्तिक असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा