दिव्यांग व्यक्तींच्या स्वंयरोजगारासाठी बीज भांडवल योजना;ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर, दि.30 (जिमाका)- समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातील दिव्यांग व्यक्तीना स्वंयरोजगारासाठी बीज भांडवल योजना सन 2025-26 वर्षा करीता अर्ज मागणी सुरु करण्यात येत आहे. ही योजना बँके मार्फत 1.5 लक्ष रु.कर्ज बँकेच्या नियमानुसार मंजूर झाल्यानंतर समाज कल्याण कडून मंजूर कर्जाच्या 20 % रक्कम सबसिडी म्हणून दिली जाते.

योजनेकरीता  दिव्यांग प्रवर्गातील अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग हे व्यकती अर्ज करु शकतात. परंतु मतीमंद (बौद्धिक अक्षम) प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तीस अर्ज करता येणार नाही. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष याच्या आताच असावे. तहसिलदार यांचे मार्च 2026 पर्यंत वैद्य  असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडावे. तहसिलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र जोडावे, बेरोजगार प्रमाणपत्र व ठराविक व्यवसायासाठी चे ना हरकत प्रमाणपत्र जोडावे, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, दिव्यांग (UDID) प्रमाणपत्र 40%  किंवा त्यापुढे असावे. दोन पासपोर्ट फोटो अर्जास जोडावे. व्यवसयाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल जोडावा. जागे बाबत भाडे पावती, करारनामा, मालकी हक्क पुरावा इ. जोडावे. अर्जदाराने अर्जातील सर्व अटी – शर्ती व्यवस्थित वाचूनच अर्ज करावा. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावयाचा आहे. अर्ज करण्याची मुदत दि.1 जून 2025 ते 15 जुलै 2025 पर्यंत राहील. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा