बेवारस मयताची ओळख पटविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि. २५(जिमाका) – सिटी चौक पोलीस ठाणे येथील नोंदीनुसार दि.३१ मे रोजी रात्री ११ वा. ५० मि. सुमारास शहाबाजार निशान जवळ एका अज्ञात इसमास श्वास घेण्याचा व इतर आजाराचा त्रास होत असल्याने त्यास प्रथमोपचारासाठी घाटी रुग्णालय येथे दाखल केले होते. तेथे उपचार सुरु असतांना दि.९ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. मयत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस हेडकॉन्सटेबल सिटी चौक पोलीस स्टेशन बी.एन.इप्पर यांनी केले आहे.
मयताचे वर्णन - अंदाजे वय ५०वर्षे, शरीरबांधा – सडपातळ,
रंग सावळा, पोशाख – घाटी दवाखान्यातील पांढऱ्या व निळया रंगाचा गाऊन, केस काळे – पांढरे, अंगावर डाव्या
हाताच्या मनगटावर जूना मार व बोटे सुजलेले, डाव्या पायाच्या टाचेला जुनी जखम, उजव्या
हाताच्या पंजावर ओम असे चिन्ह गोंदलेले, उजव्या हाताच्या मनगटावर मराठीमध्ये
मिराबाई व हनुमानाचे चित्र गोंदलेले.
वरील वर्णनाच्या इसमाबाबत काही माहिती आढळल्यास पोलीस
हेडकॉन्सटेबल सिटी चौक पोलीस स्टेशन बी.एन.इप्पर मोबाईल क्रमांक ९९२३१८७००७
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment