आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

         छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका) –गृहपाल आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह सिल्लोड, ता.सिल्लोड येथील वसतीगृहामध्ये सन २०२५-२६  या  शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून अनु.जमातीमधील इयत्ता ८ वी, इयत्ता ११ वी व पदवी  प्रथम वर्ष व पदव्युत्तर पदवी प्रथम वर्षाकरीता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यंनी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावा. वसतीगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना भोजन व निवास सुविधा मोफत असून, शैक्षणिक साहित्याकरीता डीबीटी रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. अनु.जमातीमधील गरीब होतकरु विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल एस.एस.सावदेकर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा