राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व; जात वैधता प्रमाणपपत्र पडताळणी मोहिम दि.४ जुलैपर्यंत

         छत्रपती संभाजीनगर, दि. २७(जिमाका)- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या तसेच १२ वी नंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, विधी इ. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश व इतर लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागसवर्ग, विशेष मागसवर्ग व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग या विविध प्रवर्गाच्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठीचे अर्ज समिती कार्यालयात सादर केले नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व दि.२६ जून ते ४ जुलै पर्यंत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिर्त मार्फत यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. ऑनलाईन अर्जाची हार्डकॉपी आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात त्वरीत सादर करावेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जावर समितीकडून तात्काळ कार्यवाही करुन संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी या अगोदर समितीस अर्ज सादर केलेले आहेत व त्यांच्या प्रकरणामध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकरणातील त्रुटी पूर्ततेसाठीचे शिबिराचे आयोजन कार्यालयात करण्यात आले आहे. शिबिरात सदर त्रुटीची पूर्तता सादर करण्यात यावी.असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा