माजी सैनिकांसाठी पदभरती
छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (जिमाका) -सैनिकी मुलामुलींच्या वसतीगृह,कारगिल स्मृतीवन व सैनिकी विश्रामगृह येथे विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती होणार असून माजी सैनिक, माजी सैनिक विधवा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
सैनिकी मुला- मुलींचे वसतीगृह येथे सहाय्यक
वसतीगृह अधीक्षक – १ पद, सहाय्यक वसतीगृह अधीक्षक (महिला उमेदवार-मुलींच्या
वसतीगृहासाठी) - १ पद, चौकीदार - २ पद. सफाई कामगार - २ पद, स्वयंपाकी – ५ पद, माळी
कामगार-२ पद.
सैनिकी विश्रामगृह येथे चौकीदार- १ पद, सफाई
कामगार-१ पद, कारगिल स्मृतीवन येथे माळी कामगार १ पद.
पात्रता- उमेदवार माजी सैनिक/ सैनिक विधवा असावे.
शारिरीकदृष्ट्या सक्षम, सर्व पदांसाठी किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक.
सोबत जोडावयाची कागदपत्रे -वैयक्तिक
अर्ज, आधार कार्ड, रहिवासी दाखला, पी.पी.ओ. पासबुक, डिस्चार्ज बुक.
वरील प्रमाणे आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयात सोमवार दि.३० जून
पर्यंत जमा करावे. मुलाखतीची वेळ व दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
माजी सैनिक/ सैनिक विधवा यांच्यातून उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर नागरिक
उमेदवारांमधून पदे भरण्यात येतील,असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले
आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा
रोड, छत्रपती संभाजीनगर (संपर्क ०२४०-२३७०३१३ येथे संपर्क साधावा,असे आवाहन
करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment