सहकार पुरस्कार प्रस्ताव दि.१८ पर्यंत मागविले

    छत्रपती संभाजीनगर,दि.१(जिमाका) – सहकार विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या सहकारी संस्थाना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील सहकार महर्षी पुरस्कार - १, सहकार भूषण - २१, सहकार निष्ठ -२३ अशा एकूण ४५ संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे. मराठवाडा विभागातील सर्व सहकारी सुतगिरणी, हातमाग-यंत्रमाग सहकारी संस्थांनी  आपले सहकार पुरस्कार प्रस्ताव संस्थेचे मुख्यालय असलेल्या तालुक्याच्या संबंधित सहायक, उपनिबंधक यांचेकडे सोमवार दि.१८ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे असे आवाहन  प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग प्रशांत सदाफुले यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा