अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती;अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी विदेशात पदव्युत्तर पदवी व पीएच.डी अभ्यासक्रमासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते.योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. योजनेची सविस्तर माहिती व जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. १ ऑगस्ट २०२५ आहे. अर्ज आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, ३चर्च पथ, पुणे – ०१ या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण आर. एम. शिंदे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा