आयकर विभागामार्फत सहकारी बँकांची परिषद

 


छत्रपती संभाजीनगर, दि.28 (जिमाका) – मराठवाडा विभागातील सहकारी बँकाची एक दिवसीय परिषद (दि.26) रोजी आयकर विभागामार्फत घेण्यात आली. आयकर कायदा 1961 च्या टीडीएस बाबतीत महत्व स्पष्ट करीत सर्व बँकाना टीडीएसच्या तरतुदीचे काटेकारेपणे पालन करण्याचे आवाहन सहकार आयुक्त आयकर,नाशिक  टीडीएस रेंज श्रीमती सायली ढोले यांनी केले.

या परिषदेस नाशिकच्या टीडीएस सर्कलचे आयकर उपायुक्त सदानंद कसलू, मराठवाडा अर्बन बँक्स को – ऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेडचे अध्यक्ष एस.सी.लोहिया तसेच या परिषदेसाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामधील सुमारे 75 सहकारी बँकेचे सीईओ आणि लेखा व्यवस्थापकांना आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेसाठी 120 बँकेतील अधिकारी उपस्थित होते.

नाशिक येथील टीडीएस सर्कलचे आयकर उपायुक्त सदानंद कसलू यांनी टीडीएसच्या विविध तरतुदी बाबतीत आयकर कायदा 1961 च्या कलम 80GC अंतर्गत कपातीच्या बनावट दाव्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला. तसेच मराठवाडा अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेडचे अध्यक्ष एस.सी. लोहिया यांनी परिषदेला संबोधित केले.

कार्यक्रमाची संकल्पना आयकर अधिकारी राहुल मोरे यांनी स्पष्ट करुन मान्यवंराचे आभार मानले.

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा