‘म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास दि.८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने म्हाडा सोडतीच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी अर्ज भरण्यास दि.८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी कळविले आहे.
म्हाडाच्या
१३४१ सदनिका भुखंडाच्या जुन-२०२५ प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने नक्षत्रवाडी,
अंबाजोगाई, चिकलठाणा, सातारा, देवळाई येथील विविध योजनेतील अर्ज भरण्यासाठी म्हाडाने
८ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अर्जदारांना आता दि.८ सप्टेंबर रात्री. ११.५९
वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कमेचा भरणा करुन ऑनलाईन अर्ज सादर करता येणार
आहे. या जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्जांची सोडत दि.१ ऑक्टोंबर, २०२५
रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सोडत
काढण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in
किंवा https://www.mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. या सोडतीकरीता मंडळातर्फे
अर्ज नोंदणीकरीता- ०२२-६९४६८१००, ऑनलाईन पेमेंट
करिता- १८००८९१८२९७,७०६६०४७२२२ हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
तसेच अधिक माहितीसाठी support@easebuzz.in
या ई-मेलवर संपर्क साधता येणार आहे.
या सोडतीकरिता मंडळाने अर्जदारांकरिता विभागीय कार्यालय
गृहनिर्माण भवन, सी.बी.एस. रोड, महाविर स्तंभाजवळ, छत्रपती संभाजीनगर तळमजल्यावर विशेष
मदत कक्ष स्थापन केला आहे,असेही कळविण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment