कडधान्य, तेलबिया खरेदीसाठी ई-पीक पाहणी आवश्यक

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- हंगाम २०२५-२६ मध्‍ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्‍या आधारभुत दरानुसार राज्‍यात नाफेड व NCCF च्‍या वतीने पणन महासंघामार्फत राज्‍यात कडधान्‍य व तेलबियांची (मुग, उडीद, सोयाबीन व तुर) खरेदी करण्‍यात येणार आहे. आधारभुत दराने खरेदी करण्‍याकरीता ई-पिक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्‍यक आहे. तसेच सदर खरेदी प्रक्रिया ही शेतक-यांच्‍या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपुर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे.केंद्र शासनाच्‍या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्‍याकरीता महाराष्‍ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्‍या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्‍या कालावधीत पुर्ण करावी,असे आवाहन पणन महासंघामार्फत करण्‍यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा