ऑरिक सिटी वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि.२९) समृद्धी जोडमार्गाचे लोकर्पण

 छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- ऑरिक सिटीच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त  वर्धापन दिन समारंभ व समृद्धी जोडमार्गाचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि.२९ रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे , उद्योग विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची या सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप चे व्यवस्थापकीय संचालक पी.डी. मलिकनेर, सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड यांनी केले आहे. लोकार्पण सोहळा समृद्धी महामार्गालगत तर मुख्य सोहळा ऑरिक हॉल, ऑरिक सिटी शेंद्रा, छत्रपती संभाजीनगर येथे सोमवार दि.२९ रोजी सकाळी ११ वा. होणार आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा