अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभुत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले
छत्रपती
संभाजीनगर दि.29 (जिमाका) - धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना
अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी
अनुदान योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ही योजना
राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळांनी आपले प्रस्ताव
दि.14 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी
केले आहे. प्रस्ताव सादर करण्याकरीता योजनेचा शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रांची
यादी https://mdd.maharashtara.
अनुदानासाठी पात्रतेच्या अटी व शर्ती
याप्रमाणे-
1. शासन मान्यता
प्राप्त खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये,
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळांमध्ये धार्मिक अल्पसंख्याक
विद्यार्थ्यांची संख्या किमान 70% आणि अपंग शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या
किमान 50 % असणे आवश्यक आहे.
2. यापूर्वी या
योजनेंतर्गत 5 वेळा अनुदान प्राप्त केलेल्या शाळा, संस्था अनुदानासाठी पात्र ठरणार
नाहीत.
3. महानगरपालिका व
जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखाली चालविण्यात येत
असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळा या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
4. स्वंय-अर्थसहाय्यित
शाळा या योजनेंतर्गत अनुदानासाठी पात्र असणार नाहीत.
अटी व शर्ती
नुसार पात्र शाळांनी परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, येथे दि. 14
नोव्हेंबर पर्यंत सादर करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव
स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment