‘महाज्योती’चा आज (दि.१) कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळावा
छत्रपती संभाजीनगर, दि.३१ (जिमाका)- इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या वतीने शनिवार दि.१ नोव्हेंबर रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. न्यु तिरुमला मंगल कार्यालय, पुंडलिकनगर रोड, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी १० वाजता हा मेळावा होणार असून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास उपस्थितीचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर माग्स वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र पेटकर, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment