विभागीय ग्रंथालयात संविधान दिनानिमित्त व्याख्यान

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२६(जिमाका)- संविधान दिनानिमित्त सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय व शासकीय विभागीय ग्रंथालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील समर्थनगर येथील शासकीय विभागीय ग्रंथालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. बाबाराव सरदार यांनी मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील हुसे यांनी केले. प्रमुख अतिथी  म्हणून देवगिरी कन्या विद्यालयाच्या श्रीमती संगीता जाधव उपस्थित होत्या. याप्रसंगी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी तर सूत्रसंचालन अनिल बाविस्कर यांनी केले. आभार प्रदर्शन ग्रंथालय निरीक्षक आवजी गलांडे यांनी मानले. शासकीय विभागीय ग्रंथालयाचे सभासद, वाचक,देवगिरी हायस्कूलचे विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा