मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज १५ डिसेंबर पूर्वी निकाली काढा-सहा.संचालक कोकरे

 छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)-इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांचे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० जून पासून सुरु झाली आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, शियवृत्ती, परीक्षा शुल्क योजनेचे आवेदनपत्र महाविद्यालयांनी भरुन सहायक संचालक इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग यांच्या कार्यालयात मंजूरीसाठी पाठवावयाचे आहेत. शिष्यवृत्ती अर्ज हे महाडीबीटी पोर्टलच्या लॉगईन मध्ये अल्प प्रमाणात भरण्यात आले आहेत. तरी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वतः विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन लॉगईन करावे. दि.१५ डिसेंबर पर्यंत आपपल्या महाविद्यालयांचे अर्ज भरुन निकाली काढावे. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,असे सहाय्यक संचालक दयानंद कोकरे यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

रोजगार महाकुंभ दि.२९ रोजी; जिल्ह्यात २१ ठिकाणी भरती मेळावे

छत्रपती संभाजीनगर विभागात दि.२९ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा