जागतिक एडस दिनी (दि.१ डिसेंबर) विविध कार्यक्रम

 छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- जागतिक एड्स दिन सोमवर दि.१ डिसेंबर रोजी विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१ रोजी सकाळी ७ वा. जिल्हा रुग्णालय चिकलठाणा येथून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. अडथळ्यांवर मात करुन एकजुटीने एचआयव्ही एड्सला लढा देऊ नवं परिवर्तन घडवू, ही यावर्षाची संकल्पना आहे. तसेच सायकल रॅली, लोककला पथकांचा कार्यक्रम  तसेच जागतिक एड्स दिन सप्ताहानिमित्त   पोस्टर्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, दि.८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वा. पैठण गेट ते जिल्हा परिषद पर्यंत कॅंडल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच स्वरुपाचे कार्यक्रम तालुकास्तरावरही होणार आहेत असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए.एम. मुदखेडकर यांनी कळविले असून सहभागाचे आवाहन केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा