आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

             छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका)-जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम १२ दिवसांचा व  निवासी स्वरुपाचा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत.

हे प्रशिक्षण कोलाड जि. रायगड येथे दिले जाणार असून संपूर्ण प्रशिक्षण मोफत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने  शुक्रवार दि. २ जानेवारी २०२६ रोजी इच्छूक स्वयंसेवकांच्या बॅचेस कोलाड, जि.रायगड येथे पाठविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णत: मोफत असून प्रत्येक आपदा मित्राकरीता वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसाद संच (ERK), तीन वर्षाकरीता ५ लाखांचे विमा संरक्षण  तसेच येणे - जाणे आणि निवास व भोजनाची व्यवस्था पूर्णत: विनामूल्य करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी इच्छूक असलेल्या व यापूर्वी नामनिर्देशने सादर करण्यात आलेल्या स्वयंसेवकांनी आवश्यक कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि.३० डिसेंबर २०२५ पर्यंत जमा करावी.

आवश्यक कागदपत्रे:

१.आधार कार्ड.

२.T.C. किंवा Nationality

३.      महाविद्यालयाचे ओळखपत्र

४.    पासपोर्ट फोटो 

५.     नोकरी करत असल्यास नोकरीचे ओळखपत्र

आपदा मित्र निवड निकष :

१.      प्रशिक्षणार्थी व्यक्ती ही भारताची नागरिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असावी.

२.      शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावी.

३.      १८ ते ४५ वर्ष वयोमर्यादा (माजी सैनिक, डॉक्टर, स्थापत्य अभियंता, शास्त्रज्ञ, आपत्कालीन सेवेतून सेवानिवृत्त  अधिकारी व कर्मचारी यांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल, त्या करीता वयोमर्यादा ५५वर्षे असेल. मात्र त्यांना विमा सुरक्षा देता येणार नाही)

आपदा मित्र प्रशिक्षणासाठी पात्र घटक : या प्रशिक्षणासाठी नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खाजगी सुरक्षा रक्षक, ग्राम पंचायत,नगरपालिका,जिल्हा परिषद ,जिल्हाधिकारी कार्यालय,शासकीय महामंडळे (महावितरण / ST महामंडळ) राज्य  शासन,केंद्र शासन (पोस्ट ऑफिस) यांचे शासकीय , निम शासकीय व कंत्राटी कर्मचारी.

ज्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे असेल त्यांनी १.दिपक राजेंद्र उदावंत, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ७०५८०१०४५० व मोहम्मद अर्शी खान, DDMS, छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ९९१०७२८४८७ अथवा  ddmoaurangabad16@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य  कार्यकारी अधिकारी जनार्दन विधाते यांनी केले आहे.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा