हिंद दी चादर गुरु तेग बहादुर शहीदी समागमसाठी २५० जणांची संगत नांदेड कडे रवाना

 






छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका)- हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि.२४ व २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशभरातून भावि सहभागी होत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथूनही गुरुद्वारा गुरु सिंग सभा येथून २५० जणांची पहिली संगत आज रवाना झाली. या संगतला स्थानिक भाविकांनी रवाना केले. आणखीन मोठ्या संख़्येने भाविक नांदेड येथे जाणार आहेत. या भाविकांची तेथील निवास, भोजन, विश्रांती, पार्कींग आदी सुविधा करण्यात आली आहे. लंगर सेवेतही योगदान देण्यात आले आहे. सरदार हरिसिंग, सरदार कुलदीपसिंग निर्थ, अवतारसिंग छाबडा, रणजितसिंग मलिक, इंदरजितसिंग छटवाल, हरविंदरसिंग मुछल आदी गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा