जिल्ह्यातील मतमोजणीची तालुकानिहाय ठिकाणे निश्चित

 छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा सुधारीत कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार मतदान शनिवार दि.७ रोजी (सकाळी साडेसात ते सायं.साडेपाच वा.) तर  मतमोजणी सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

प्रशासनाने मतमोजणीसाठी तालुकानिहाय ठिकाणे निश्चित केली असून तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे याप्रमाणे-

१.      सोयगाव तालुकाः- तहसील कार्यालयाच्या नवीन इमारत, सोयगाव.

२.      सिल्लोड तालुकाः-औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यशवंत महाविद्यालयाच्या पाठीमागे, सिल्लोड.

३.      कन्नड तालुकाः- छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा इन-डोअर हॉल, कन्नड.

४.    फुलंब्री तालुकाः-तहसील कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, फुलंब्री.

५.     खुलताबाद तालुकाः- कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खुलताबाद.

६.      वैजापूर तालुकाः- विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर.

७.     गंगापूर तालुकाः- मुक्तानंद महाविद्यालय, इनडोअर स्टेडियम,गंगापुर

८.     छत्रपती संभाजीनगर तालुकाः- शासकीय तंत्रनिकेतन, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर.

९.      पैठण तालुकाः संतपीठ पैठण येथील प्रशासकीय इमारत, पैठण.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा