आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका)- जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हा  प्रशिक्षण कार्यक्रम एकूण १२ दिवसीय निवासी स्वरुपाचा असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने दि. १२ फेब्रुवारी रोजी इच्छूक स्वयंसेवकांच्या पुढील बॅचेस कोलाड जि.रायगड येथे पाठविण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दि.१० फेब्रुवारी पर्यंत जमा करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः मोफत असून प्रत्येक आपदा मित्राकरीता वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच (ERK), ३ वर्षाकरीता ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण व येणे जाणे आणि निवास व भोजनाची व्यवस्था पूर्णतः शासन व शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेमार्फत विनामूल्य करण्यात आली आहे. तसेच महिला व मुलींसाठी स्वतंत्र बॅच व येण्या जाण्याची सुविधा करण्यात आली आहे.  या प्रशिक्षणासाठी इच्छूक असलेल्या व यापूर्वी नामनिर्देशने सादर करण्यात आलेल्या स्वयंसेवकांनी आवश्यक असलेली कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि.१० फेब्रुवारी पर्यंत जमा करावी.

आवश्यक कागदपत्रेः-आधार कार्ड,शाळा सोडल्याचा दाखला किंवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,महाविद्यालयाचे ओळखपत्र,पासपोर्ट फोटो, नोकरी करत असल्यास नोकरीचे ओळखपत्र.

निवड निकष: अर्जदार व्यक्ती भारताची नागरिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असावी. शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम, वयोमर्यादा १८ ते ४५वर्ष, (माजी सैनिक, डॉक्टर, स्थापत्य अभियंता, शासकीय आपत्कालीन सेवेतून सेवानिवृत अधिकारी व कर्मचारी यांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल, त्या करीता वयोमर्यादा ५५ वर्षे असेल मात्र त्यांना विमा सुरक्षा देता येणार नाही)

अधिक माहितीसाठी संपर्क अधिकारी / कर्मचारीः-

१.श्री. विवेक राजेंद्र उबाळे,जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर,संपर्क क्रमांक : 7058010450

२.श्री. मोहम्मद अश्रफ खान, DDMS,छत्रपती संभाजीनगर,संपर्क क्रमांक : 9910728487

ई-मेल : ddmaurangabad16@gmail.com

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा